आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद साेमवार: डाेक्यावर ५०० काेटींचे कर्ज, तरी २५ हजार मुलांना माेफत शिक्षण !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संस्थेतील विद्यार्थ्यांसमवेत डाॅ. अच्युत सामंत. - Divya Marathi
संस्थेतील विद्यार्थ्यांसमवेत डाॅ. अच्युत सामंत.
मुंबई - डाेक्यावरपाचशे काेटी रुपयांचा कर्जाचा भार असतानाही अाेरिसातील एक दानशूर सामाजिक कार्यकर्ता देशभरातील सुमारे २५ हजार गरीब विद्यार्थ्यांना माेफत शिक्षण, निवास भाेजनाची सुविधा देत अाहे. या कामासाठी डाॅ. अच्युत सामंत यांचा नुकताच बहरीनमधील ‘ईसा अवाॅर्ड’ या सर्वाेच्च नागरी पुरस्काराने गाैरव करण्यात अाला. यावर्षी महाराष्ट्रातील अादिवासी गरीब विद्यार्थ्यांना अापल्या संस्थेमार्फत माेफत शिक्षण निवासाची साेय देण्याची याेजना त्यांनी तयार केली अाहे.
अाेरिसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर येथे डाॅ. सामंत कलिंग इन्स्टिट्यूट अाॅफ साेशल सायन्स (कीस) ही शैक्षणिक संस्था चालवतात. त्यात नर्सरीपासून ते पदवी शिक्षणापर्यंत देशभरातील सुमारे २५ हजार गरीब विद्यार्थ्यांना माेफत शिक्षण, निवास भाेजनाची व्यवस्था केली जाते. या संस्थेत प्रवेशासाठी दरवर्षी तब्बल ५० हजार अर्ज करतात, त्याची छाननी करून हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाताे. एकट्या झारखंड राज्यातील ५०० अादिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश दिला जाताे.
या संस्थेत अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणही दिले जाते. क्रीडाक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांनी रग्बी, कबड्डी, नेमबाजी यासारख्या खेळात राष्ट्रीय पातळीवरील पारिताेषिके पटकावली अाहेत, असे डाॅ. सामंत अभिमानाने सांगतात.
महाराष्ट्रातील स्थिती
२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लाेकसंख्या ११.२४ काेटी अाहे. दरवर्षी त्यात १६ टक्के वाढ हाेते. अनुसूचित जाती (एससी) लाेकसंख्या ११.८ टक्के (१.३३ काेटी) अाहे. त्यांचा साक्षरता दर ७९.७ काेटी अाहे. अनुसूचित जमाती (एसटी) लाेकसंख्या १.०५ काेटी म्हणजे ९.४ टक्के अाहे. त्यांचा साक्षरतेचा दर ६५.७ टक्के अाहे.
काही लाेक ‘पागल’ म्हणतात
‘किस’संस्थेअंतर्गत कलिंग इन्स्टिट्यूट अाॅफ इंडस्ट्रियल टेक्नाॅलाॅजी (कीट) चालवली जाते. या संस्थेच्या नफ्यातून गरीब विद्यार्थ्यांचा खर्च केला जाताे. ६५ काेटी रुपये व्याज भरणे कठीण नाही. गरीब मुलांसाठी मी सर्व कमाई पणाला लावताे, त्यामुळे लाेक मला ‘पागल’ही म्हणतात, असे डाॅ. सामंत म्हणतात.
नक्षलग्रस्त भागातील मुलांना मदत करणार
अाेरिसातनक्षलवाद्यांची माेठी समस्या हाेती. मात्र ‘िकस’ संस्थेच्या माध्यमातून अादिवासी विद्यार्थ्यांना माेफत शिक्षण मिळू लागले, शिक्षणामुळे त्यांना राेजगार मिळू लागल्याने त्यांचे जीवन पालटले. अाता चित्र बदलले अाहे, काही नक्षलींनी तर जंगलामध्ये डाॅ. सामंत यांचे नाव ‘अादिवासींचे भगवान’ असे झाडावर काेरले अाहे. मात्र भगवान जगन्नाथांच्या अाशीर्वादानेच हे सारे शक्य हाेत अाहे, असे डाॅ. सामंत विनम्रपूर्वक सांगतात. महाराष्ट्रातही नक्षलवादाची समस्या अाहे. त्यामुळे या भागात ‘कीस’चा विस्तार करण्याचा मनाेदय अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लवकरच अापण प्रस्ताव ठेवणार असल्याचे सामंत म्हणाले.
Á५०० एकर जागेत उभारणी करण्यात अालेल्या ‘कीस’ या खासगी विद्यापीठात दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध अाहेत. त्यासाठी सात विविध बॅंकांकडून सुमारे ५०० काेटी कर्ज घेतले अाहे. व्याजापाेटी दरवर्षी ६५ काेटी रुपये माेजावे लागतात.
Á२५ हजार विद्यार्थ्यांना माेफत शिक्षण, निवास भाेजनाच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी प्रतिविद्यार्थी सुमारे ३० हजार रुपये खर्च.
Áसंस्थेच्या नफ्यातील टक्के, अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनातून टक्के, इन्स्टिट्यूटचे फर्म कँटीनधारकाच्या मदतीतून काही रक्कम अशी विद्यार्थ्यांवरील खर्चाची सुमारे ९० टक्के उभारली जाते. उर्वरित १० टक्के रक्कम देणगीदारांकडून जमा केली जाते.