डॉ. बाबासाहेब अांबेडकरांच्या / डॉ. बाबासाहेब अांबेडकरांच्या ‘राजगृह’ने घेतला मोकळा श्वास

विशेष प्रतिनिधी

Mar 07,2016 05:16:00 AM IST
मुंबई- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन दशकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या दादरच्या हिंदू काॅलनीतील ‘राजगृह’ या निवासस्थानाचा परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून कायम ठेवण्याचा िनर्णय मुंबई पालिकेने घेतला अाहे. इतकेच नव्हे तर या इमारतीच्या आसपास परवाना देऊन ज्या सहा टपऱ्या पालिकेने पंधरा वर्षांपूर्वी वसवल्या होत्या, त्यांचेही इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात अाले.
काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी िवधिमंडळाच्या मागील पावसाळी अधिवेशनात ‘फेरीवालामुक्त’ असणाऱ्या राजगृह परिसराचे फेरीवाला क्षेत्रात रूपांतर करण्याचा पालिकेचा डाव उघडकीस आणत त्यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली हाेती. सभागृहात िवरोधकांनी या प्रश्नी मुंबई मनपा व सरकारला धारेवर धरत राजगृह या प्रेरणास्थळाची जपणूक करण्याची मागणी केली होती. हा परिसर गेली अनेक वर्षे फेरीवालामुक्त होता, परंतु पालिकेच्या वाॅर्ड पुनर्रचनेत हा परिसर फेरीवाल्यांसाठी खुला करण्याची िशफारस सहआयुक्तांच्या समितीने केली होती. मात्र िवधिमंडळात या प्रश्नी गहजब होताच पालिका प्रशासन सावध झाले अाणि प्रशासनाने पूर्वीप्रमाणे राजगृह परिसर फेरीवालामुक्त कायम ठेवला. दरम्यान, सन २०१५ च्या नागपुरातील िहवाळी अधिवेशनातही हा प्रश्न आमदार जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित केला. तसेच िवधिमंडळाच्या आश्वासन समितीच्या समोरही प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर मुंबई पालिकेने अखेर राजगृह फेरीवाल्यांसाठी खुला करण्याचा िनर्णय स्थगित तर केलाच; पण राजगृहासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे परवानाधारक असलेल्या सहा टपऱ्यांचे रुईया काॅलेजच्या बाजूला स्थलांतर केले. तसेच राजगृहाच्या पुढ्यात वर्षानुवर्षे धंदा मांडून बसलेल्या भेळ, आइस्क्रीम, वडापाव िवक्रेत्यांना अाणि चप्पल दुरुस्ती करणाऱ्यांनाही हटवण्यात अाले अाहे.

उशिरा का हाेईना झाली इमारतीला रंगरंगाेटी
राजगृहाचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होणार होते. त्यामुळेही आंबेडकर कुटुंबीयांनी या वास्तूकडे लक्ष िदले नव्हते. पण इंदू िमलचा मुद्दा अवतरला अाणि राजगृहाचे दैव फिरले. नाही म्हणायला सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला. पण कोट्यवधींचे प्रेरणास्थळ असलेल्या राजगृहाची कैक वर्षे साधी रंगरंगाेटीही झाली नव्हती. यंदा बाबासाहेबांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे होत आहे. त्याचे औचित्य साधत आंबेडकर कुटुंबीयांनी राजगृहाची डागडुजी करुन रंगरंगोटीही केली आहे. त्यात आता आजूबाजूच्या टपऱ्या आणि फेरीवाल्यांना हटवल्याने राजगृहाची भव्य अन् देखणी वास्तू रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
X