आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैतिक जबाबदारी स्वीकारात डॉ. सावंतांनी राजीनामा द्यावा - विखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत केलेल्या २९७ कोटी रु.च्या खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी केलेले निलंबन हाच घोटाळ्याचा पुरावा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केला, तर या खरेदीची नैतिक जबाबदारी स्वीकारत आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केली. आरोग्य विभागातील औषध खरेदी घोटाळा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे चर्चा करण्यात आली.

या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांवर घणाघाती आरोप केले. आरोग्य मंत्र्यांचे आपल्या खात्यावर नियंत्रण राहिले नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही आरोग्यमंत्र्यांना लक्ष्य केले. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य खात्याने जी २९७ कोटी रु.च्या औषधांची खरेदी केली. त्यावर आरोप होताच आरोग्यमंत्र्यांनी लगेचच दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. याचा अर्थ घोटाळ्यात तथ्य आहे, असा आरोप त्यांनी केला.

आरोग्य संचालक पवार निलंबित
२९७ कोटी रु.चा घोटाळा झाल्याच्या आरोपांची निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी ही विरोधकांची मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अखेर मान्य केली. आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी विधान परिषदेत केली.