आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हत्या: स्कॉटलँड यार्ड पोलिसांचा ८ दिवसांत अहवाल मिळवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि एम. एम. कुलबर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेल्या बंदुकीचा अहवाल स्कॉटलँड यार्डकडून आठ आठवड्यात मिळवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला गुरुवारी दिले.याप्रकरणी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याबाबत दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी याचिका दाखल केल्या आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, स्कॉटलँड यार्डकडून अहवाल मिळवण्यासाठी गृह मंत्रालय आणि विदेश मंत्रालयाने सीबीआयला आवश्यक परवानगी द्यावी. तिन्ही प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर गजाआड केले नाहीतर लोकांच्या मनात सरकारी यंत्रणेबाबत संशय निर्माण होईल, असेही न्यायालयाने म्हटले.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कुलबर्गी यांची हत्या सारख्याच पद्धतीने करण्यात आली. त्यामुळे तिघांचे मारेकरी एकच असू शकतात, असे सीबीआयने सुनावणीदरम्यान सांगितले. डॉ. दाभोलकर प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे, तर कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणा करत आहे.
बातम्या आणखी आहेत...