आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील स्मारक जुलैपर्यंत पूर्ण होणार - राजकुमार बडोले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पंचतीर्थ उभारण्याची घोषणा केली होती. - Divya Marathi
पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पंचतीर्थ उभारण्याची घोषणा केली होती.
मुंबई -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील नियोजित स्मारक येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली. 
 
स्मारकाच्या कामाची देखरेख करण्यासाठी राज्य सरकारने एक सल्लागार समिती स्थापन केली आहे. लंडन दौऱ्यावर असलेले बडोले यांनी या समितीची पहिली बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.  मीडिया रिपोर्टनुसार,  समितीने स्मारकासंबंधी काही सूचना केल्या असून, त्यावर विचार सुरु असल्याचे बडोले यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, ते ज्या इमारतीत वास्तव्यास होते, ती इमारत स्मारक स्वरुपात जतन करण्यासाठी राज्य सरकारने ऑगस्ट 2015 मध्ये खरेदी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...