डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे / डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोक आंबेडकर यांचे निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त, अध्यक्ष अशोक आंबेडकर (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. जे. जे. हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिव्य मराठी वेब टीम

Dec 09,2017 02:13:00 AM IST

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त, अध्यक्ष अशोक आंबेडकर (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. जे. जे. हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दादर येथील चैत्यभूमीवर शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते अंधेरी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पुत्र राजरत्न आंबेडकर हे अाहेत. दिवंगत अशोक आंबेडकर हे बाबासाहेबांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांचे पुत्र होत. गेली अनेक वर्षे अशोक आंबेडकर आणि बाबासाहेबांचे सख्खे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात भारतीय बौद्ध महासभेवरील विश्वस्तपदावरून वाद होते. न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागला असून बौद्ध महासभेचे आपणच अध्यक्ष आहोत, असा अशोक आंबेडकर यांचा दावा होता. त्यांनी काही काळ रिपब्लिकन पक्षातही काम केले होते. अशोक आंबेडकर यांच्या निधनाने चळवळीची हानी झाली आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रमाताई आंबेडकर-तेलतुंबडे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर हे त्यांना भेटून आले होते.

पुढील स्लाइडवर वाचा... अशोक आंबेडकर यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची हानी- रामदास आठवले

अशोक आंबेडकर यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची हानी- रामदास आठवले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी अशोक मुकुंदराव आंबेडकर यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असून ती कधीही भरून येणार नसल्याची शोकभावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

X
COMMENT