आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Get 7.79 Lack Fund

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला 1.79 लाखाचा निधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राज्य सरकारने 1 कोटी ७९ लाख ९९ हजारांचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे संस्कृत आणि मानसशास्त्र विभागाच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे़
मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत सरकारने हा निधी दिला आहे. त्यातून विद्यापीठाला ६2 लाख ६0 हजार रुपये खर्च करून मानसशास्त्र विभागाची इमारत तर ६5 लाख ७4 हजार रुपये खर्च करून संस्कृत विभागाची इमारत बांधायची आहे़ तसेच संरक्षक भिंत बांधण्याकरिता 51 लाख ६5 हजार रुपये देण्यात आले आहेत़
शासनाने यंदा विद्यापीठाला मराठवाडा विकास कार्यक्रमांतर्गत तीन कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातील 2 कोटी ९1 लाख 55 हजार रुपये वितरित करावयाचे बाकी आहेत़