आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sanjay Deshmukh To Be The New Vice Chancellor Of University Of Mumbai

डॉ. संजय देशमुख यांनी स्‍वीकारली मुंबई विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाची सूत्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. संजय देशमुख - Divya Marathi
डॉ. संजय देशमुख
मुंबई - मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. संजय देशमुख यांनी आज (मंगळवार) पदभार स्‍वीकारला. यापूर्वीचे कुलगुरू राजन वेळूकर यांचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. त्‍यामुळे 20 जूनला राज्यपाल के. विद्यासागरराव यांनी डॉ. देशमुख यांची नियुक्ती होती.
डॉ. देशमुख हे मुंबई विद्यापीठात 5 जानेवारी 2005 पासून लाईफ सायन्सेसचे प्राध्यापक म्‍हणून काम पाहत आहेत. त्‍यांनी 1968 मध्ये मुंबई विद्यापीठातून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून M.Sc केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातूनच बॉटनी या विषयात 1990 मध्ये डॉक्टरेट मिळवली. चेन्नईच्या एम. एस; स्वामीनाथ रिसर्च सेंटर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मानव संधान संस्था आणि रामभाऊ म्हाल्गी प्रोबोधिनीमध्ये काम केलेले आहे.