आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त धर्मगुरू सॅबेस्टिन मार्टिनचा वसईत गूढ मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वसईमधील भुईगाव येथील वादग्रस्त धर्मगुरू, आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे संचालक सॅबेस्टिन मार्टिन यांचा गूढ मृत्यू झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या वसई येथील घरी मृतदेह आढळून आला. एप्रिल महिन्यापासून आजारी असल्यामुळे ते प्रार्थना केंद्रात जात नव्हते. मार्टिन अनेक वर्षांपासून त्यांच्या कथित चमत्कारामुळे चर्चेचा विषय व वादग्रस्त ठरले हाेते.
आजारी रुग्णांना ते ‘जादू’ने बरे करत असल्याची अंधश्रद्धा त्यांचे अनुयायी पसरवत असत. मात्र गरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, भाेंदूगिरीच्या माध्यमातून मार्टिन त्यांचे धर्मपरिवतन करायचे, असा आराेपही केला जायचा.
पुढे पाहा फोटो, धर्मगुरू सबॅस्टीयन मार्टिन अशी करत भोंदूगिरी..
बातम्या आणखी आहेत...