आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ता, गावित यांची कोंडी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेले डॉ. विजयकुमार गावित यांच्याविरुद्धची याचिका दाखल करून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतल्याने त्यांच्या अडचणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता वाढणार आहेत. त्यांच्याविरुद्धच्या या आरोपांमध्ये सकृद्दर्शनी तथ्य आढळल्याचा अहवाल राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. गावित यांच्या खुल्या चौकशीसाठी मागितलेल्या परवानगीवर 6 आठवड्यांत म्हणणे मांडण्याचे आदेश कोर्टाने राज्याला दिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका जनहित याचिकेच्या सुनावणीत या घडामोडी घडल्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आपली कन्या हिना गावित यांच्यासाठी मते मागणार्‍या गावितांची आणि कालपर्यंत त्यांच्याविरुद्ध रान उठवून आता त्यांना डोक्यावर घेऊन फिरणार्‍या भाजपची पंचाईत होणार आहे.