आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरडी पडली देशातील सर्वात मोठी दुसरी नदी, 139 वर्षानंतर रामकुंड उघड्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी यंदा अनेक वर्षानंतर कोरडी ठक्क पडली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीवर बनविण्यात आलेले रामकुंड उघडे पडले आहे. 139 वर्षानंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की, रामकुंड पाण्याशिवाय दिसले आहे. 1877 साली नाशिकमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी रामकुंड उघडे पडले होते. त्यानंतर आता असे घडले आहे.
रामकुंडात पाणी नसल्याने येथील पुरोहितांनी रामकुंडात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. रामकुंड हिंदू भक्तांसाठी महत्त्वपूर्ण श्रद्धास्थान आहे. कुंभ मेळ्यादरम्यान कोट्यावधी लोक येथे येऊन दर्शन घेतात. मात्र, यंदा गोदावरी नदी व त्यावरील रामकुंड कोरडे ठक्क पडले आहे.
दुष्काळाने केला कहर, गोदावरी आटली-

- नाशिक पासून 25 किमी दूरवरील चंदोरी गावातून कायम वाहणारी गोदावरी नदी पाण्याचा ठिपकाही शिल्लक नाहीये.
- नदीद पाणीच नसल्याने गेल्या 34 वर्षानंतर येथील मंदिरे प्रथम उघडी पडली आहेत.
- स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, 1877 मध्ये ही मंदिरे दिसली होती. त्यानंतर आताच पाहायला मिळत आहेत.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, गोदावरी नदीचा कसा वाळवंट झाला आहे...