आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रीमगर्ल हेमा मालिनीवर राज्य सरकार फिदा, कोटींचा भूखंड दिला 70 हजारांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एकीकडे राज्यातील मोकळे भूखंड परत घेण्याचे काम सुरू असतानाच राज्य सरकारने भाजप खासदार आणि प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांना त्यांच्या नाट्य विहार केंद्रासाठी मुंबईतील कोट्यवधींचा भूखंड फक्त ७० हजार रुपयांत दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर सरकारकडून यापूर्वी घेतलेला भूखंडही हेमा यांनी अजून सरकारला परत केलेला नाही.

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी ओशिवरा येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड हेमा मालिनीच्या संस्थेस दिला. यासाठी प्रति चौरस मीटर ३५ रुपये दर आकारण्यात आला होता. मात्र, हेमा मालिनी यांच्या संस्थेने या वित्तीय खर्चाची पूर्तता अद्यापही केलेली नाही. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या माहितीनुसार, हा भूखंड उद्यानासाठी राखीव आहे. महसूल विभागाने जानेवारी १९७६ च्या मूल्यांकनाचा आधार घेत त्यांना हा भूखंड दिला. त्या वेळी प्रति चौरस मीटर दर १४० रुपये इतका होता. हेमा मालिनी यांना २५ टक्के दराने म्हणजे फक्त ३५ रुपये इतका दर आकारला जाणार आहे.

२५% रक्कम उभी करण्यात अपयश
हेमा मालिनी यांना यापूर्वीही अाधीच्या युती सरकारच्या काळात अंधेरीतील वर्सोवा येथे एक भूखंड देण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी १० लाख रुपये भरले होते. परंतु या भूखंडावरील काही भाग सीआरझेडमध्ये असल्याने त्यावर कोणतेही बांधकाम झाले नाही. आणि पुन्हा युतीचे सरकार सत्तारूढ हाेताच त्यांना नुकताच अाणखी एक भूखंड देण्यात अाला. तसेच हेमा मालिनी यांनी नाट्यविकास केंद्रासाठी आजपर्यंत एकूण प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के रक्कमसुद्धा उभी केली नसतानाही भाजप सरकारने या बाबीकडे दुर्लक्ष करत त्यांना भूखंड दिल्याचे समाेर अाले अाहे.
पुढील स्लाईडवर वाचा, उद्यानासाठी आरक्षित होता भूखंड....नाट्यविहार प्रकल्पास १८ कोटी खर्च अपेक्षित