आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dream, Imagine And Explore: PM Modi's Message To Scientists

किफायतशीर शेतीचे तंत्रज्ञान विकसित करा - नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विज्ञान, तंत्रज्ञानाचा फायदा गरीब आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचवा तसेच शेतकर्‍याची जोखीम कमी करून शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना केले. १०२ व्या भारतीय विज्ञान परिषदेत ते बोलत होते. शेतीमधील जोखीम कमी करून ती फायदेशीर बनवणे, ग्रामीण भागासाठी किफायतशीर तंत्रज्ञानाचा विकास, आरोग्य सुविधांत सुधारणा करत भारताला उत्पादनक्षम राष्ट्र बनवणे अशी उद्दिष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांसमोर ठेवली.

नेहरूंचे कौतुक
आधुनिक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक धोरणामुंळेच आज भारत सक्षम झाल्याचे गौरवोद‌्गार मोदींनी काढले.