आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद चालक हे ‘बॉम्बर’च, शिक्षावाढीचा केंद्राचा विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दारू पिऊन गाडी चालवणारा ‘सुसाइड बॉम्बर’पेक्षा कमी नसतो. स्वत:सोबतच रस्त्यावरील लोकांचा जीव तो धोक्यात घालत असतो, असे निरीक्षण दिल्लीतील न्यायालयाने साेमवारी नोंदवले आहे. दरम्यान, मद्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करण्याचा विचार असल्याचे केंद्र सरकारने साेमवारीच मुंबई उच्च न्यायालयातील एका सुनावणीत सांगितले.

दिल्ली न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वीरेंद्र भट यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. राजस्थानचा ट्रकचालक काना राम याने त्याला याप्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या २० दिवसांच्या शिक्षेला आव्हान दिले होते. या वेळी भट म्हणाले, ‘अशा आरोपींना कडक शिक्षा केली पाहिजे. त्यानंतर रस्ते अपघात कमी होतील. कोणतीही व्यक्ती दारू प्यायल्यानंतर योग्य प्रकारे गाडी चालवेलच, याबाबत हमी देता येत नाही’, असेही न्यायालयाने म्हटले.

‘नशेतील चालकाची हमी काेण देणार ?’
दाेन वर्षापर्यंत शिक्षा, दंड करण्याचे निर्देश
नशेत गाडी चालवणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करण्याचा विचार असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. सलमान खानच्या हिट अँड रनप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली. ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने सरकारी वकिलाला पत्र लिहिले आहे. हे पत्र न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आले. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात कडक शिक्षा करण्याचा विचार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

कलम बदलण्याची काेर्टाकडून सूचना
दारू पिऊन अपघात करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची सूचना न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावणीत केली होती. याबाबतचे कलमही बदलण्यात यावे, असेही म्हटले होते. राज्य सरकारला सूचना करताना वाहन अपघात कायद्यात दुरुस्ती करून शिक्षा वाढवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कलम ३०४ नुसार कमीत कमी दोन वर्षांची शिक्षा व दंड किंवा दोन्हीही ठोठावण्यात यावे, तर कलम २७९ नुसार ६ महिन्यांची शिक्षा व दंड किंवा दोन्ही सुनावण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.