आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drinker Throw Shoe To Nitin Gadkari In Pune, Divya Marathi

मद्यपीने गडकरींवर बूट फेकला, वेळीच रोखल्याने हल्ल्यातून बचाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नितीन गडकरी यांच्यावर सोमवारी रात्री कोथरूडमध्ये एका मद्यपीने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी वेळीच रोखल्याने गडकरी या हल्ल्यातून बचावले. कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
गडकरींना आयोगाची नोटीस
काय खायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचं ते पिऊन घ्या. हरामाचा माल गरिबांकडे येण्याची हीच वेळ आहे. लक्ष्मीपूजनाअगोदरच लक्ष्मीदर्शनाचा योग आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अडचणीत आले आहेत. त्यांचे हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले असून त्यांना नोटीसही बजावून बुधवारी सायंकाळपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.