आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: अंधेरी स्टेशनमध्ये क्रिकेटरने घुसवली भरधाव कार, पोलीसांनी घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या युवा क्रिकेटपटूने सोमवारी सकाळी अंधेरी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कार चालवली. सकाळी ७.२० वाजता स्थानकावर मोठी गर्दी होती,त्यामुळे एकच गोंधळ उडाला. चूक लक्षात आल्यानंतर हरमीतसिंहने कार थांबवली. रेल्वे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. हरमीत २०१२ च्या अंडर - १९ वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळला आहे. मुंबईकडून रणजी करिअर सुरू करणारा हरमीत सध्या जम्मू-काश्मीरकडून खेळत आहे.
 
हरप्रीत अंडर 19 चा खेळाडू...
- हरप्रीत सिंग अंडर 19 वर्ल्डमध्ये कप खेळला आहे. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. 
- अंधेरी स्टेशनवर पाहुंन्यांना सोडण्यासाठी हरप्रीत आला होता.
- परत जातांना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी 1 नंबर प्लॅटफॉर्मवर घुसली.
- हरप्रीतची चौकशीसुरू असून, त्याला मेडीकलसाठी पाठवण्यात आले आहे.
- हरप्रीत मुंबईतील मलाड भागातील रहिवाशी आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...