आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीना बोरा मर्डर प्रकरणात श्यामवर माफीचा साक्षीदार- CBI कोर्टाची परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्यामवर राय याला कोर्टात हजर करताना... - Divya Marathi
श्यामवर राय याला कोर्टात हजर करताना...
मुंबई- संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या शीना बोरा मर्डर प्रकरणात इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय हा माफीचा साक्षादीर होणार आहे. या घटनेतील सत्य समोर यावे यासाठी सीबीआय कोर्टाने श्यामवर याला सरकारी पक्षाच्या वतीने माफीचा साक्षीदार होण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. श्यामवर रायला माफीचा साक्षीदार बनविण्याची विनंती सीबीआयने आपल्या कोर्टाकडे केली होती. याला आज परवानगी देण्यात आली. शीना बोरा मर्डर प्रकरणात आपला व इतर आरोपींचा काय व कसा रोल होता याची माहिती आपण देऊ असे श्यामवर रायने सांगितले होते.
श्यामवर राय याने मे महिन्यात माफीचा साक्षीदार होण्यासाठी सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सीबीआयने या याचिकेवर विचार करण्यासाठी कोर्टाकडून वेळ मागून घेतला होता. त्यानंतर 6 जून रोजी सीबीआयने श्यामवर रायला माफीचा साक्षीदार करवून घेण्यास तयार असल्याचे सांगितले. सीबीआयने त्याला माफीचा साक्षीदार बनविण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर सीबीआयच्या विशेष कोर्टानेही त्याला हिरवा कंदिल दिला. 10 मे रोजी श्यामवर रायला कोर्टात हजर करण्यात आले होते त्यावेळी या हत्याकांडाबाबत सगळे खरे सांगायचे आहे, असा दावा करत माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.
हत्याकांडाचे सत्य उघड करण्यासाठी आपल्यावर कुणीही दबाव टाकलेला नाही तसेच कुणी आपल्याला धमकावलेलेही नाही. उलट केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होत असल्यानेच आपण माफीचा साक्षीदार बनून शीना हत्याकांडाचा उलगडा करू इच्छितो. यात सामील कोण व हे हत्यांकाड कसे घडले आणि गुन्ह्याचे भागीदार कसे बनलो हे सांगण्यास तयार आहोत, असे राय याने कोर्टात सांगितले होते. शीनाची हत्या करण्यात आली तेव्हा आपण तेथे होतो आणि हत्या करण्यास मदत केली. शीनाची गळा दाबून हत्या केल्याचेही त्याने कोर्टात सांगितले होते.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...