आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drope The Ashok Chavan Name From The Adarsh Chargesheet, CBI Demand To Court

आदर्श आरोपपत्रातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळा, केंद्रीय अन्वेषण विभागाचा न्यायालयात अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आदर्श घोटाळ्यातील राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आरोपीच्या यादीतून वगळण्यात यावे, असा अर्ज सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केला आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी देण्यासंबंधीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर सीबीआयने हा अर्ज दाखल केला. या प्रकरणात सीबीआयला काही नवे पुरावे हाती आले तरच राज्यपालांच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाऊ शकणार आहे. या घोटाळ्यात जेवढे पुरावे सीबीआयच्या हातीआले ते सर्व पुरावे सीबीआयने न्यायालयात सादर केलेले आहेत. त्यामुळे इतक्यात चव्हाण यांच्यावर खटला चालवण्यासंदर्भात राज्यपालांनी प्रस्ताव फेटाळल्याच्या निर्णयावर फेरविचार केला जाणार नाही, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले.
पेड न्यूजप्रकरणी निकाल राखीव
अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध 2009 मध्ये भोकरचे डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी या निवडीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.