आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought Aid Bringing : All Parties Mp Give Word To Chife Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळी मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करू : सर्वपक्षीय खासदारांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘दुष्काळ व जळगाव- नाशिकमध्ये झालेल्या गारपिटीची भरपाई मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू’, असे आश्वासन राज्यातील खासदारांनी गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चव्हाण यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

सूत्रांनी सांगितले की, बैठकीत दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसह केंद्राकडून मदत मिळवण्याबाबत चर्चा झाली. तसेच मुंबईसाठी ज्यादा निधी द्यावा अशी मागणीही झाली. केंद्राचे आदिवासी विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माणिकराव गावित यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री निरुत्तर झाले.

राज्यासाठी मोठी तरतूद
पुढील पाच ते सहा महिने राज्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करायचा आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात दुष्काळ निवारणासाठी मोठी तरतूद करण्यात येईल, त्यातून प्रामुख्याने पिण्याचे पाणी उपलब्ध करणे आणि जनावरे जगविण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.या बैठकीस शरद पवार यांच्यासह, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर, लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह 37 खासदार उपस्थित होते.

पाण्याबाबत राजकारण नको : शरद पवार
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना तात्पुरते रेशनकार्ड द्यावे, चारा छावण्यासाठी मराठवाड्यात कोणी पुढे येत नाही. त्यामुळे युवकांच्या गटांना छावण्यांसाठी प्रोत्साहन द्यावे, रोहयोचे वेतन सुधारित करावे आदी सूचना शरद पवार यांनी केल्या. सांगली, सातारा, पुणे, नगर येथील धरणांत पुरेसे पाणी आहे, हे पाणी तहानलेल्या भागाला देण्यामध्ये हात आखडता घेऊ नये. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्यात राजकारण नको, असेही पवार म्हणाले.