आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought Clouds Over State, One Month Water Storage In Marathwada

राज्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले! मराठवाड्यात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पावसाने ओढ दिल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला अाहे. मराठवाड्यात तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. दुबार पेरणीचे संकट तसेच पिण्याच्या पाण्याचा आतापासून तुटवडा जाणवू लागल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावू लागले असून पावसाअभावी बिकट स्थिती ओढावली आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मंगळवारी बोलतााना दुष्काळजन्य परिस्थितीचे संकेत दिले. राज्य सरकारने आतापासूनच दुष्काळाचा सामना करण्यासाठी तयारी न केल्यास त्याचा मोठा फटका जनतेला बसू शकतो, असे वरीष्ठ अधिकारीही बोलू लागले आहेत.

मराठवाड्याच्या ११ धरणांत ७ जुलै २०१५ रोजी १७ टक्के पाणीसाठा असून तो पिण्यासाठी फक्त महिनाभर पुरेल इतकाच आहे. यंदाही राज्यात २०१२ तसेच २०१३ सारखी गंभीर स्थिती ओढावू शकते. जायकवाडी या सर्वात मोठ्या धरणात १४ टक्के पाणीसाठा असून बाकीच्या १० धरणांमध्ये तर दोन आकडीही पाणीसाठा शिल्लक नाही. माजलगाव, मांजरा, निम्म तेरणा,निम्न दुधना, सीना कोळेगाव धरणांने तर पाणीसाठ्याने शून्य पातळीचा तळ गाठला आहे. यंदा पाऊस सरासरीइतका असेल असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज होता.जूनमध्ये सुरुवातीचे काही दिवस राज्याच्या विविध भागांत दमदार पाऊस झाला. यामुळे शेतक-यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने हात आखडता घेतल्याने सर्वांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. शेतक-यांवर तर दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इतरत्र शेतीचा प्रश्न गंभीर होत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात तर शेतीबरोबर पिण्याचे पाण्याचे मोठे संकट उभे राहण्याची भीती आहे.
मराठवाड्यातील सर्व धरणंमध्ये ७ जुलै २०१२ ला २९२ दलघमी, तर २०१३ ला ३५७ दलघमी पाणीसाठा होता. कमी होत चाललेला पाऊस पाहता यंदाचे वर्ष २०१२ सारखे असू नये, अशी प्रार्थना जनता करत आहे. अशा कमी पावसामुळे शेती तर तोट्यात जाईलच, पण पिण्याचे पाण्याचे मोठे संकट उभे रािहल्यास राज्याला त्याचा मोठा फटका बसू शकतो. आधीच राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. ३ लाख कोटींंपेक्षा अधिक कर्ज सध्या सरकारवर असून यंदा पाऊसपाणी बरा झाल्यास तिजोरीवर भार पडणार नाही, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंंटीवार यांनी दिली.

पुढे वाचा... इतक्यात दुष्काळ जाहीर नाहीच