आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought Effect On Sugarcane Industry Six Factory Close And Export Stop

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्‍काळाची साखर उद्योगावर संक्रांत - सहा कारखाने बंद व निर्यात थांबली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून त्याचा सामान्यांच्या जनजीवनाबरोबरच उद्योगांवरही परिणाम होत आहे. अनेक शहरातील उद्योगांना देण्यात येणा-या पाण्यात कपात करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील सहा साखर कारखानेही पाण्याअभावी बंद पडले आहेत. मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्‍ट्रातील कारखान्यांनाही टंचाईचा फटका बसू लागला आहे.त्यामुळे फेबुवारीअखेर 50 पेक्षा अधिक कारखान्यांचा पट्टा पडण्याची शक्यता असल्याची माहिती साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

राज्यात 108 सहकारी आणि 60 खासगी साखर कारखाने आहेत. त्यापैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील बाणगंगा व भीमाशंकर कारखाना, सोलापूर जिल्ह्यातील स्वामी समर्थ (अक्कलकोट), सांगोला ( सोलापूर), नाशिकमधील वसंतदादा (कळवण) आणि सांगलीतील माणगंगा (आटपाडी) हे कारखाने बंद पडले आहेत. दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार असल्याने हे कारखानदार चिंतेत आहेत.

दुष्काळ रोजंदारीच्या मुळावर
* मराठवाडा, पश्चिम महाराष्‍ट्रातील गाळप संकटात
* महिना अखेरीस आणखी कारखाने अडचणीत येणार
* गाळपाऐवजी चा-याला ऊस देण्याकडे कल
* ऊसतोडणी मजुरांवर बेरोजगारीची वेळ
* गुजरात, कर्नाटकातूनही ऊस मिळण्यात अडचणी

कारखान्यापेक्षा चारा बरा
कारखाने बंद झाल्याने राज्यातील हजारो ऊसतोडणी मजुरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. पश्चिम महाराष्‍ट्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात असली तरी पाण्याअभावी तेथील शेतक-यांनी उसाची चा-या साठी विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कारखान्यांना ऊस मिळेना. गुजरात, कर्नाटकातूनही ऊस मिळत नसल्यामुळे पश्चिम महाराष्‍ट्रातील कारखाने संकटात सापडले आहेत.

उत्पादन वाढले, दर घटले
गेल्या वर्षी राज्यात 503.4 लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून 55.2 लाख मेट्रिक टन साखर निर्मिती झाली होती. यंदा मागील वर्षापेक्षा 1 लाख 66 हजार मेट्रिक टन गाळप जादा झाले असून त्याद्वारे 22015 लाख मेट्रिक टन जादा साखर उत्पादन झाले आहे. यावर्षी आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत साखरेला कमी दर असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणात होणार नाही, अशी माहिती संजीव बाबर यांनी दिली.

आकडे बोलतात
168 राज्यातील एकूण कारखाने
50 कारखान्यांचा पट्टा फेब्रुवारीत पडणार
55.2 लाख मे. टन गतवर्षीचे
साखर उत्पादन
22015 लाख मे. टन यावर्षीचे
साखर उत्पादन