आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईसदृश गावांतील कर्ज वसुलीला स्थगिती, राज्यातील २४ हजार गावच्या शेतक-यांना लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील टंचाईसदृश २३.८११ गावांमधील शेतक-यांनी जिल्हा बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे रूपांतर दीर्घ मुदतीत करून कृषी कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याचे आदेश बुधवारी सहकार विभागाने दिले.

मागच्या वर्षीच्या खरिपात अपु-या पावसामुळे राज्याच्या २३ हजार ८११ गावे टंचाईसदृश (दुष्काळग्रस्त) जाहीर करण्यात आली होती. त्या गावांतील शेतक-यांनी सहकारी बँकांकडून घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जाचे रूपांतर दीर्घ मुदतीच्या कर्जात करण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. तसेच टंचाईसदृश सर्व गावांमधील सहकारी बँकाकडून घेतलेल्या कृषी कर्जाची स्थगिती थांबवण्यात यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व जिल्हा बँकांनी कटाक्षाने करावी, असे सहकार विभागाने काढलेल्या पत्रकात म्हटलेले आहे.