आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात रंगतेय दुष्काळाचे राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पक्षीय भेदाभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील काही मंत्री आपापल्या मतदारसंघात दुष्काळाचे राजकारण करण्यात गुंतले असल्याने चारा छावण्या सुरू होऊ शकल्या नसल्याची धक्कादायक माहिती एका मंत्र्याने दिली.

मराठवाड्यात चारा छावण्या सुरू होत नसल्याबाबत ओरड सुरू आहे. या भागातील सहकारी संस्था सक्षम नसल्याने त्यांना अनामत रकमेत सूट देण्यात यावी, अशी मागणी या भागातील नेत्यांनी केल्यानंतर सरकारने ही अटही शिथिल केली. मात्र, चारा छावण्या सुरू न होण्याबाबत वेगळेच राजकारण असल्याची माहिती कॉँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

मराठवाड्यात अद्यापही चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. याचे कारण शोधले असता बीड जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांकडे छावणी सुरू करण्याबाबत अर्ज केलेल्या संस्था पुढे आल्याच नाहीत, त्यामुळे नव्या संस्थांनी अर्ज करूनही त्यांना छावण्या सुरू करण्याची परवानगी मिळत नाही. बीडचे राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या छावण्या अडवून ठेवल्याची माहिती कॉँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिली. या भागातील दुष्काळ दौ-या दरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अर्ज आलेल्या आणि मागणी करणा-या सहकारी संस्थांना छावण्या सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले आहेत.