Home »Maharashtra »Mumbai» Drought Proon District Get Two Corore

दुष्काळी जिल्ह्यांना दोन कोटींचा निधी

प्रतिनिधी | Jan 10, 2013, 06:31 AM IST

  • दुष्काळी जिल्ह्यांना दोन कोटींचा निधी

मुंबई - राज्यातील दुष्काळ निवारण आणि तत्सम कारणांसाठी प्रत्येक जिल्हाधिकाºयाला दोन कोटी रुपयांचा आकस्मिक निधी दिला जाईल, असा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी प्राधान्याने चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत टंचाई निर्माण झालेल्या गावांत आवश्यकतेनुसार कामे सुरू करावीत कोणतीही व्यक्ती रोजगारापासून वंचित रहाणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. राज्यातील टंचाई परिस्थिीत पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी पाणीपुरवठा विभागाला आतापर्यंत 413 कोटी 98 लाख रुपये निधी दिल्याचेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले. जनावरांच्या छावण्यांवर 214 कोटी 13 लाख रुपये खर्च करण्यात आले असून छावण्यांमध्ये 3 लाख 46 हजार 847 जनावरे आहेत, तर चारा वितरणासाठी 684 कोटी रुपये निधी वितरित झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आली.

राज्यात खरीप पिकांची अंतिम पैसैवारी जाहीर करण्यात आली असून त्यात 7 हजार 64 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळली आहे. रब्बी पिकांच्या अंतिम पैसेवारीत 3 हजार 905 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आली.

Next Article

Recommended