आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरणात ठाणे पोलिसांनी नाव गोवले; ममता कुलकर्णीचा व्हीसीद्वारे जाहीर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दोन हजार कोटींच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांनी आपले नाव विनाकारण गोवले आहे. या प्रकरणात मी पूर्णत: निर्दोष आहे, असे अभिनेत्री ममता कुलकर्णीने सांगितले. ममताने पत्रकारांशी व्हिडिआे कॉन्फरसिंगद्वारे शुक्रवारी संवाद साधला.

ममता म्हणाली, ठाणे पोलिस आणि अमेरिकेच्या ‘ड्रग एन्फोर्समेन्ट अॅडमिनिस्ट्रेशन’ या संस्थेच्या कटाची मी बळी ठरली आहे. गेल्या वीस वर्षांपासून मी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे. पैसा, संपत्ती, ऐषोआराम या भौतिक सुखाच्या पलीकडे माझे जीवन गेले आहे. असे असताना अचानक ठाणे पोलिसांनी माझे नाव ड्रग्ज प्रकरणात गोवले. ठाणे पोलिस २००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मला आरोपी ठरवतात. मात्र, माझ्या बँक खात्यात केवळ २५ लाख रुपये आहेत. जे मी बॉलीवूडमधून कमावले आहेत. मी कधीच कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. माझे आयुष्य सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. या कटातून तो देव मला सुखरूप बाहेर काढेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ठाणे आणि सोलापुरातून मोठ्या प्रमाणात इफेड्रिन अंमली पदार्थाचा साठा पकडला होता.

सुषमा स्वराज यांना लिहिले पत्र
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याकडेही आपण पत्र लिहून बाजू मांडल्याचे तिने या वेळी सांगितले. ममता सध्या केनियातील मोम्बासा शहरात राहत असून योगिनीचे आयुष्य जगत असल्याचे तिचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबईत आलेल्या ममताच्या वकिलांनी तिच्यावरील आरोपांचे खंडन केले.
बातम्या आणखी आहेत...