आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत Drunk & Drive, विदेशी नागरिक गंभीर जखमी, चालक ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संग्रहित छायाचित्र)
मुंबई- मुंबईत पुन्हा ड्रंक अॅंड ड्राईव्हची घटना समोर आली आहे. लोअर परेलमधल्या पॅलेडिअम हॉटेलबाहेर अनुप पांडे नावाच्या मद्यधुंद कारचालक तरूणाने तीन टॅक्सींना धडक दिली. या अपघातात एक परदेशी नागरिक गंभीर जखमी झाला आहे. कारचालक अनुप पांडेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी धाडण्यात आले आहे.
या अपघातात तीनही टॅक्सींचे मोटे नुकसान झाले आहे. परदेशी नागरिकावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी कारचालक अनुप पांडे हा सेंट रिजेस हॉटेलमध्ये मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे. पांडेंच्या हॉटेलमध्ये गेल्या आठवड्यापासून नित्यनियमाने पार्टी होत आहेत. त्यामुळे तोही मद्यधुंद असण्याची शक्यता आहे. पार्टीवरुन घरी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पुढे येत आहे.
अनुप पांडेने मद्यप्राशन केले होते का? याचा वैद्यकीय अहवाल लवकरच येईल त्यानंतरच त्याच्यावर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. तोपर्यंत त्याला पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...