आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी म्हणाली, 2 पेग व्हिस्की घेतली, हॉटेल स्टाफ म्हणतो 6 पेग घेतले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- जान्हवी गडकर - Divya Marathi
फाईल फोटो- जान्हवी गडकर
मुंबई- दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या जान्हवीने आपल्या ऑडी कारने सोमवारी रात्री दोघांचा जीव घेतला असला तरी त्याआधी दोनच दिवस आधी तिने बीएआरसीच्या दोन सुरक्षा रक्षकांना उडवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी गोवंडीत जाह्नवीने बाईकवर चाललेल्या बीएआरसीच्या दोन सिक्युरिटी गार्ड्सला धडक दिली होती. याच जान्हवीने सोमवारी रात्री 6 पेग व्हिस्की रिचवून बेदारकारपणे ऑडी चालवून मुंबईतील ईस्टर्न फ्रीवे वर एक टॅक्सीला धडक दिली होती ज्यात दोघांचा प्राण गेला. चेंबूर परिसरात राहणारी जान्हवी उच्चाभ्रू कुटुंबातील असून रिलायन्स कंपनीच्या लीगल सेलवर उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे.
जान्हवीने दिली कबुली, पोलिसांकडे सबळ पुरावे-
जान्हवी गडकर सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच आपण केवळ 2 पेग व्हिस्की पिल्याचे तिने सांगितले. तर त्याचे 2000 हजार रूपये बिल भरल्याचेही सांगितले. मात्र, हॉटेलमधी वेटरनी दिलेल्या माहितीनुसार जान्हवीने त्या रात्री 6 पेग घेतले होते व त्याचे बिल साडेचार हजार रूपये आले होते. कंपनीला एक प्रोजेक्ट मिळाल्याने सहकारी राहुल दत्त आणि शेलेंद्र राणे यांच्यासमवेत हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्याचे जान्हवीने कबुली दिली आहे. पार्टीनंतर साडेदहाच्या सुमारास मी घराकडे निघाले. मात्र मरीन ड्राईव्ह येथे दोन तास कारमध्येच झोपल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री 1 च्या सुमारास ईस्टर्न फ्री वे वरून घराकडे चालले होते. मी नशेत होते त्यामुळे मला रस्ताही आठवत नव्हता अशी कबुली दिल्याने जान्हवीच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
रूग्णालयातील डॉक्टरांनी जान्हवीला ओळखले-
दोन दिवसापूर्वी जान्हवीने ज्या सुरक्षारक्षकांना धडक दिली होती त्यांना मुंबईतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. योगायोगाने वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस जान्हवीला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथील उपस्थित डॉक्टरांनी सांगितले की, ही तीच महिला जिला शनिवारी येथे आणले गेले होते.
जान्हवीच्या मित्रांनी होती भीती, पण तिने नाही ऐकले-
रात्री उशिरा पार्टी केल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या जान्हवीला घरी जाता येणार नाही असे तिच्या मित्रांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्नही केला. मात्र जान्हवीने ऐकले नाही. तिने त्यांचा सल्ला साफ धुडकावून लावताना सांगितले की, मी यापूर्वी अशा स्थितीत भरपूर वेळा गाडी चालवली आहे. त्यामुळे काळजी करू नका, मी आरामात घरी जाईन त्यानंतर फोन करेन.
चौकशीच्या फे-यात अडकू शकते जान्हवी-
पोलिस अधिका-यांचे म्हणणे आहे की, जान्हवीने शुक्रवारी रात्रीही दोघांना धडक दिल्याचे पुढे आल्यानंतर आम्ही तिच्या चौकशीची कक्षा रूंदवण्याचा विचार करीत आहोत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसापूर्वीच जान्हवीने दुचाकीवरून जाणा-या दोन सुरक्षारक्षकांना धडक दिली होती. त्यावेळी जान्हवी स्वत: त्या दोघांना रूग्णालयात घेऊन आली होती. त्यांना फार जखम झाली नव्हती. सुरक्षारक्षकांची केवळ दुचाकी डॅमेज झाली होती व तिने बाईकच्या दुरुस्तीसाठी काही पैसे देऊन हे प्रकरण मिटवून टाकले होते. डीसीपी संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले की, तो अपघात एक छोटी घटना होती. घटनेनंतर तिने पीडितांना मदत केली होती व उपाचारासाठी रूग्णालयातही घेऊन गेली होती. घटना छोटी असल्याने गोवंडी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली नाही. तर दुसरीकडे, काही पोलिस अधिका-यांनी याउलट माहिती दिली आहे. एका पोलिस अधिका-याने सांगितले की, शुक्रवारच्या घटनेनंतर जर पोलिसांनी जान्हवीच्या विरोधात कारवाई केली असती तर कदाचित सोमवारी रात्री तो अपघात झाला नसता व दोघांचे प्राण नव्हे तर दोन कुटुंबांची होणारी वाताहात थांबली असती.
जान्हवीच्या मित्रांच्याही अडचणीत वाढ-
घटनेच्या रात्री जान्हवी ज्या हॉटेलात आपल्या मित्रांसह दंग होती त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, जान्हवी नशेत असताना तिच्या मित्रांची जबाबदारी होती की तिला घरी सुरक्षित सोडणे. मात्र तसे झाले नाही. जान्हवीच्या मित्रांना ती कंट्रोलमध्ये नसल्याने गाडी चालवू शकणार नाही याची कल्पना होती. अशावेळी त्यांनी एखादा ड्रायव्हर बोलवायला हवा होता किंवा तिला घरी सोडायला हवे होते.
पुढे स्लाईड्सवर वाचा, जान्हवीचा कधी आणि कसा अपघात झाला....