आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunk Lawyer Janhavi May Have Knocked Down 2 Guards On A Bike Last Week

मुंबईत इन्सानियत हरवलीय, मदतीला काेणीच धावले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘भरधाव अाॅडीने अामच्या टॅक्सीला ठाेकरल्यानंतर जखमी अवस्थेतील माझे वडील इतर विव्हळत हाेते. त्या वेळी रस्त्यावरून अनेक वाहने गेली. मी मदतीसाठी टाहाे फाेडत हाेताे, मात्र त्यापैकी एकालाही मदत करावीशी वाटली नाही, ही लाजिरवाणी बाब अाहे. मुंबईतील इन्सानियतच हरवलीय,’ अशा शब्दांत मुंबईतील अपघातातील मृताचा १६ वर्षीय मुलगा नाैमन सबुवाला याने पत्रकारांकडे भावना व्यक्त केल्या.

महंमद सलीम सबुवाला, नाैमन, टॅक्सीचालक महंमद अब्दुल सय्यद हे इतर कुटुंबीय साेमवारी मध्यरात्री टॅक्सीतून घराकडे येत हाेते. त्याच वेळी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेतील जान्हवी गडकरच्या कारने त्यांच्या टॅक्सीला जाेराची धडक दिली. यात महंमद सबुवाला अब्दुल सय्यद हे दाेघे जागीच ठार झाले, तर इतर दाेघे जखमी झाले. हा घटनेची माहिती देताना नाैमन म्हणाला, ‘मी दहावीत पास झाल्यामुळे माझे वडील खूप खुश हाेते. त्याच अानंदात त्यांनी अाम्हाला हाॅटेलात जेवणासाठी नेले हाेते. मात्र, जान्हवीने केवळ अामच्या अानंदावर विरजणच टाकले नाही तर अामचे छत्रच हिरावून घेतले. तिला जास्तीत जास्त कडक शासन व्हायला हवे. एक वकील असतानाही ती एवढ्या बेजबाबदारपणे कशी काय वागू शकते,’ असा सवालही त्याने उपस्थित केला.

‘अपघात झाला त्या वेळी रस्त्यावरून अनेक वाहने जात हाेती. मी त्यांच्याकडे मदतीची, दयेची भीक मागत हाेताे. मात्र, त्यापैकी एकानेही मदतीसाठी थांबण्याची तसदी घेतली नाही. गाड्या येत हाेत्या, वेग कमी करत हाेत्या, गंभीर जखमी झालेल्या माझ्या वडिलांकडे पाहून पुन्हा भरधाव निघून जात हाेत्या. मुंबईत ‘इन्सानियत’च राहिलेली नाही याची मला लाज वाटतेय,’ अशी खंतही नाैमनने बाेलून दाखवली.

बेजबाबदार जान्हवी गडकरची वकिली सनद रद्द करा
मृतटॅक्सीचालक अब्दुल सय्यद यांची मुलगी निलाेफर लंडनमध्ये असते. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच ती मुंबईत अाली. निलाेफर म्हणते, ‘अशा बेजबाबदार वाहने चालवणाऱ्यांना कडक शासन हाेईल, असे अापल्या देशातील कायदे व्हायला हवेत. जान्हवीचा केवळ वाहन परवानाच नव्हे, तर तिच्या वकिलीची सनदही रद्द करायला हवी. तिच्यावर खुनाचे कलम लावून कारवाई व्हायला हवी.’