आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunk Lawyer Janhavi May Have Knocked Down 2 Guards On A Bike Last Week

जान्हवीने ढाेसली हाेती मर्यादेपेक्षा चाैपट जादा दारू, पबमध्ये गेल्याचेही स्पष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मद्यधुंद अवस्थेत भरधाव ‘अाॅडी’ दामटून दाेघांचा बळी घेणारी रिलायन्स कंपनीतील ३५ वर्षीय कॉर्पोरेट लॉयर जान्हवी गडकर हिने प्रमाणापेक्षा चाैपट मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीतून समाेर अाले अाहे. पंचतारांकित हाॅटेलमधील पार्टीत अापण दाेनच पेग घेतल्याचे ती सांगत असली तरी प्रत्यक्षात तिने सहा पेग ढाेसल्यासे तिच्या रक्ततपासणीच्या अहवालातून समाेर अाले अाहे.
इतकेच नव्हे, तर हाॅटेलमधील पार्टी संपल्यानंतर जान्हवीने कुलाब्यातील अायरिश पबमध्ये जाऊनही मद्यपान केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाेलिसांना सांगितले. मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील आयरिश हाऊस पबमध्ये जाऊन चौकशी केली असता मरिन प्लाझा हाॅटेलातील मित्रांसाेबतची पार्टी संपल्यानंतर जान्हवी या पबमध्ये अाल्याचे स्पष्ट झाले. पाेलिसांनी या ठिकाणाहून जान्हवीने भरलेले बिलही ताब्यात घेतले अाहे. या पबमध्ये क्रेडिट कार्डद्वारे केवळ दाेन हजारांचे बिल भरल्याचे ती सांगत असली तरी प्रत्यक्षात साडेचार हजार रुपये भरल्याचे दिसून अाले अाहे. पोलिस आता पबमधील सीसीटीव्ही फुटेजही मिळवत आहेत. या ठिकाणी जान्हवी दारू प्यायल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाल्यास तिच्या अडचणी वाढू शकतात.
न्यायालयीन काेठडी-
शुक्रवारीकोठडीची मुदत संपल्यानंतर जान्हवीला हजर करण्यात अाले. त्या वेळी पाेलिस काेठडी वाढवण्याची पाेलिसांची मागणी फेटाळून लावत न्यायालयाने तिला २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जान्हवीने जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर १५ जूनला सुनावणी होईल.
दारूचा अाेव्हरडाेस-

परवाना असला तरी मर्यादित दारू प्यावी, असा नियम अाहे. त्यानुसार एका मद्यपीच्या शंभर ग्रॅम रक्तात ३० मिलिग्रॅम अल्काेहाेल असेल, तर ती सामान्य अवस्था समजली जाते. मात्र, जान्हवीच्या शंभर ग्रॅम रक्तात सुमारे चाैपट म्हणजे १२० मिलिग्रॅम अल्कोहोल आढळून आले आहे.
बाेनसची पार्टी-

याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत जान्हवीचा मित्र राहुल दत्तासह दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. ताेही साेमवारी मध्यरात्रीच्या पार्टीत तिच्यासाेबत हाेता. जान्हवीला कंपनीकडून बोनस, इन्सेंटिव्ह मिळाला होता त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी तिने मित्रांसह पार्टी केली हाेती.