आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना शिव्या देणारी मॉडेल अंजूमन नायरला 14 दिवसाची कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मध्यरात्री दोन वाजता डीजेचा दणदणाट करून पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिव्यांची लाखोली वाहणारी मॉडेल अंजूमन नायर हिला पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. आज तिला कोर्टात हजर केले असता कोर्टाने तिला 21 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अंधेरी येथील सर्मथ आंगण सोसायटीच्या 20 मजल्यावर अंजूमन राहते. रविवारी मध्यरात्री तिने मोठय़ा आवाजात डीजे सुरू केला. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेजार्‍यांनी याबाबत पोलिसांकडे दूरध्वनीवरून तक्रार केली. पोलिसांनी मध्यरात्री या सोसायटीत येऊन अंजूमनला आवाज कमी करण्यास सांगितले. मात्र तिने पोलिसांनाच शिवीगाळ केली. तसेच 'आपल्या नादी लागल्यास गंभीर परिणाम होतील', असा इशाराही दिला. तसेच समर्थ अंगनमध्ये तुम्ही येऊन मला डीजे बंद करायला सांगणार आहात काय?. अंजूमन जेव्हा पोलिसांशी हुज्जत घालत होती त्यावेळी सोसायटीतील काही लोकांनी तिचा व्हिडिओ क्लिप बनवली.
पुढे वाचा, प्रसिद्धीसाठी स्टंट...