आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunken Fashion Designer Arrested After Hit One By Car

मद्यपी फॅशन डिझायनर निधी पारेखने एकाला उडवले, पोलिसांकडून अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणारी हायप्राेफाइल वकील तरुणी जान्हवी गडकर हिचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईत आणखी एका फॅशन डिझायनर तरुणीने एका तरुण चहा विक्रेत्याला उडवल्याची घटना मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातानंतर तिने स्वत:ला गाडीत लॉक करून घेतले. निधी पारेख (२५) असे या फॅशन डिझायनर तरुणीचे नाव आहे.

मंगळवारी रात्री निधी मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून कारने घरी जात होती. वांद्र्यातील कार्टर रोडवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिने एकाला उडवले. यात चहावाला गंभीर जखमी झाला. परिसरातील लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच घटनास्थळी पोलिस पोहोचले व तिला गाडीतून बाहेर येण्यास सांगितले. मात्र, निधी दरवाजा उघडत नव्हती. अखेर पोलिसांनी चावी बनवणाऱ्याच्या मदतीने कारचा दरवाजा उघडून तिला बाहेर काढले.

कारमध्ये लॉक करून घेणारी दुसरी महिला
निधी पारेख डिझायनर क्रिस्टे डे चुन्हाकडे मुख्य फॅशन को-ऑर्डिनेटर म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वी मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या एका महिलेने अशाच प्रकारे स्वत:ला गाडीत लॉक करून घेतले होते. मात्र, पोलिसांनी अखेर तिला बाहेर काढून अटक केली होती. दरम्यान, वकील तरुणी जान्हवी गडकर हिनेही मद्यधुंद अवस्थेत ऑडी दामटून दोघांचा बळी घेतला होता.

मद्यपान केल्याचे निष्पन्न
पोलिसांनी निधीला पहाटे साडेतीनच्या सुमारास कारमधून बाहेर काढल्य़ानंतर तिला रुग्णालयात नेले. तिच्या रक्ताचे नमुने घेतले असता त्यात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. सोबत महिला पोलिस नसल्याने रात्री निधीला घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.