आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत तरूणाने दारूच्या नशेत केला 90 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील चेंबूर भागात 28 वर्षीय तरूणाने दारूच्या नशेत एका 90 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. चेंबूरमधील टिळकनगर भागातील एका झोपडपट्टीत सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे. हा तरूण विकृत असल्याचे कळते तसेच दारूच्या नशेत त्याने हा घृणास्पद प्रकार केल्याचे समोर आले आहे.

टिळकनगर भागातील एका झोपडपट्टीत ही वृद्ध महिला राहाते. त्यांच परिसरात राहणारा प्रभू नाडर या तरूणाने मध्यरात्री 2 च्या सुमारास या वृद्धेच्या घरात जबरदस्तीने शिरला. त्यानंतर त्याने या वृद्धेचे हात बांधून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करून नाडर पसार झाला व संबंधित वृद्ध महिलेने शेजारील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. टिळकनगर पोलिसांनी आरोपी प्रभू नाडरला अटक केली आहे. आरोपी हा त्या वृद्ध महिलेच्या नातूचा मित्र असल्याचे कळते आहे. सध्या पीडित वृद्ध महिलेवर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहे.