आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतही डीटीएचची सक्ती ; 31 मार्चपर्यंतची मुदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईपाठोपाठ आता औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिकसह 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये 31 मार्चपर्यंत डायरेक्ट टू होम म्हणजे डीटीएच यंत्रणा सक्तीची होणार असून त्याची अंमलबजावणी लगेच सुरू होईल. डिजिटायझेशनच्या पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये ही यंत्रणा 100 टक्के राबवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाचे सचिव उदय कुमार वर्मा यांनी शुक्रवारी दिली.

सध्या बाजारामध्ये परदेशी कंपन्यांचे सेट टॉप बॉक्स उपलब्ध असून ते स्थानिक कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत. स्थानिक कंपन्यांना 12 टक्के कर भरावा लागत असल्याने त्यांची किंमत जास्त आहे. मात्र स्थानिकांना फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकारचा प्रयत्न राहणार असून त्यांना करामध्ये काही सवलत देण्याचा विचार करत असल्याचे वर्मा म्हणाले.