आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Due To Chief Minister Home Price Go Up, BJP MLA Ashish Shelar Allegation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांमुळे घरे महागली, भाजप आमदार अ‍ाशिष शेलार यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - घर निर्मितीची खाती मुख्यमंत्र्यांच्या हाती आहेत. या खात्यांच्या निर्णयप्रक्रियेत दिरंगाई आहे. त्यामुळे म्हाडा, सिडको, एसआरए योजनेचा निर्णय तत्काळ होत नाही. त्यामुळे मुंबईतील घरांची निर्मिती थंडावली असून त्यास मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी केला.


मुंबईत मोठ्या प्रमाणात घरांच्या किमती वाढल्या आहेत. सीआरझेडमध्ये कोणतेही घरबांधणीचे काम करायचे झाल्यास सीआरझेड आणि एमसीझेडएम या कमिट्यांची परवानगी लागते. सीआरझेडच्या गाइडलाइन अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे 33 (7), 33(9) च्या पुनर्विकास योजनेच्या परवानग्यांना दिरंगाई होते, असा आरोप त्यांनी केला.


मुंबईत 60 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. त्यासाठी एसआरए प्राधिकरण केले गेले. त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. या प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणा-या योजनेतील 80 टक्के प्रकल्प वेगवेगळ्या कारणांनी रखडले आहेत. त्यामुळे गरिबांना त्यांची हक्काची घरे मिळू शकत नाहीत, असा दावा शेलार यांनी केला. म्हाडाचे प्रमुख मुख्यमंत्री असून म्हाडाअंतर्गत 33(5) पुनर्विकास योजनेचे प्रस्तावही रखडले आहेत. पर्यावरण खात्याने डॉपलर रडार दक्षिण मुंबईत बसवले आहे. त्याच्या 200 किमीच्या परिसरात 60 मी. पेक्षा उंच इमारत बांधता येत नाही, उंचीचे निर्बंध घालण्यात आल्याने घरांची निर्मिती कमी होत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.


हेरिटेज कमिटीने घोषित केलेल्या हेरिटेज प्रिसेंटच्या परिसरात कोणतीही रिडेव्हलपमेंट करता येत नाही. त्या एमएमआरडीएचेही अध्यक्ष मुख्यमंत्रीच आहेत. नगरविकास खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून शेकडो प्रस्ताव या खात्याकडे प्रलंबित आहेत. रिडेव्हलपमेंटच्या प्रस्तावांना मंजुरी मिळत नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला.


कनेक्ट टू मोदी
नरेंद्र मोदी यांचा प्रभाव असलेला मोठा मतदार मुंबईत आहे. त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सोशल मीडिया नेटवर्किंगच्या माध्यमातून कनेक्ट टू मोदी असे एक अभियान मुंबईत राबवले जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.