आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळामुळे नागपूरचे आयपीएल सामने मोहालीत हलवण्यास तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार आयपीएल फ्रँचायझी किंग्ज इलेव्हन पंजाब आपले तीन सामने नागपूरऐवजी मोहालीत हलवण्यास तयार अाहेत. दुसरीकडे पुण्यात होणारे सामनेही महाराष्ट्राबाहेर हलवणे शक्य आहे का, अशी विचारणा न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली आहे.महाराष्ट्रात दुष्काळ असताना पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलवावेत, अशी जनहित याचिका "लोकसत्ता आंदोलन' या संस्थेने दाखल केली आहे. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या न्यायपीठासमोर याची सुनावणी सुरू आहे. आयपीएलचे पुण्यात ९, मुंबईत ८ तर नागपूरमध्ये तीन सामने होणार असून मुंबईत पहिला सामना झाला आहे.
पुण्याजवळील गावांना पाणी देणार? : पुण्यात मैदानावर रोज ४० लाख लिटर पाणी वापरले जात आहे. एवढेच पाणी बीसीसीआय पुणे परिसरातील गावांना पुरवू शकते का, मुख्यमंत्री दुष्काळ निधीत मंडळाचे योगदान आहे का, अशी विचारणा हायकोर्टाने केली आहे.