आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dutch Technology Use For Drought Eradication Khadse

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळ निवारणासाठी डच तंत्रज्ञानाचा वापर, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार डच तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. शुक्रवारी कृषी विभागातील उच्चपदस्थ अधिकारी आणि नेदरलँडचे परराष्ट्रमंत्री लिलीन प्लोमन, तेथील कृषिमंत्री शेरान डिजस्मका यांच्यात बैठ.क झाली त्या वेळी ते बोलत होते.

खडसे म्हणाले, राज्यातील काही भागात अजूनही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड आणि इस्रायलची सरकार मदत घेणार आहे. डच तंत्रज्ञानाचा वापर हा राज्यातील पशुधन आणि शेतीकामासाठी करण्यात येईल. कृषी क्षेत्रात डच तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर होण्यासाठी इस्रायल आणि नेदरलँडची आम्ही सहा महिन्यांपर्यंत मदत घेणार आहोत, असेही ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे या विभागात फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी नेदरलँडची मदत घेऊन केंद्रे स्थापन करण्यात येतील.

दुग्धजन्य पदार्थांबाबत मार्गदर्शन घेणार
नेदरलँड हा दूध आणि डेअरी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथील तज्ज्ञ राज्यातील दूध उत्पादकांना सल्ला देतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.