आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री,आमदारांना वेटिंग करायला लावतो हा IAS अधिकारी, 11 वर्षात 9 वेळा बदली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गरीब व सामान्यांसाठी काम करणारे व कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले भारतीय प्रशासन अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांना मागील आठवड्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तुकाराम मुंढे सध्या पुण्यातील पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्या कामाची छाप सोडली होती.
 
मुंढे हे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेतच पण समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजना पोहचल्या पाहिजेत अशी तळमळ असते. याचे कारण ते स्वत: एक गरीब व सामान्य कुटुंबातून पुढे आहेत. गरिबी काय असते ते त्यांनी लहानपणापासूनच पाहिले, अनुभवले आहे. त्यामुळेच आज कलेक्टर असूनही त्यांचे राहणीमान सामान्य आहे, तर मनाने संवेदनशील आहेत. मराठवाड्यासारख्या दुष्काळी व मागास भागात बालपण गेल्याने व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याने मुंढे यांना आहे रे आणि नाही रे वर्गाची पक्की जाण आहे. त्यामुळेच ते एक कठोर व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पुढे आले. 
 
एखाद्या सामान्य व्यक्तीला जी वेळ दिली ते पाळतात मग त्या वेळेत मंत्री, खासदार-आमदार आला तरी त्यांना ताटखळत बसायला लावतात. त्यामुळेच अनेक बडे नेते व लोकप्रतिनिधी तुकाराम मुंढेंबाबत सरकार दरबारी तक्रार करत असतात. एखादा अधिकारी आम्हाला वेटिंग करायला लावतो हेच मूळी बड्या नेत्यांना ढाचते. त्यामुळेच 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मुंढेंची 11 वर्षात तब्बल 9 वेळा बदली करण्यात आली आहे.
 
आज आपण या सदरात तुकाराम मुंढे यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.
 
पुढे स्लाईडद्वारे क्लिक करा व वाचा तुकाराम मुंढे यांच्याविषयी अधिक माहिती...
बातम्या आणखी आहेत...