आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • E poster War Between Bjp shivsena Conflicts Reflects On Social Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: \'शहा\'णे व्हा, शिवसेनेची भाजप व अमित शहांविरोधात ई-पोस्टरबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना-भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून शह-कटशहाचे राजकारण सुरु असतानाच आज भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. शहा हे आज दिवसभर मुंबईत असून, भाजपच्या विविध पदाधिका-यांच्या घरी जाणार आहेत. षण्मुखानंद सभागृहात 5 ते 7 या दरम्यान पक्षाच्या पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्यातील अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, शिवसेनेने अमित शहा यांना मातोश्री भेटीचे निमंत्रण दिले असल्याचे समजते आहे. तसेच आज रात्री उशिरा म्हणजे 9 नंतर शहा मातोश्रीवर हजेरी लावतील असे कळते आहे.
त्यापूर्वी शहा हे प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन राजकीय स्थितीचा आढावा घेतील. दरम्यान, अमित शहा मातोश्रीवर जाणार नसल्याचे त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवरून दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर सेनाही आक्रमक झाली आहे. यातून सेनेने ई-पोस्टरबाजी सुरु केली आहे. व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर भाजपविरोधात व फक्त उद्धव ठाकरे अशी पोस्टर्स फिरू लागली आहेत. त्यात सेनेने भाजपला 'शहा'णो हो असा सल्ला दिला आहे.
काय आहे 'शहाणा हो'चा अर्थ...
भाजपचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, राजनाथ सिंह यासारखे बडे नेते बाळासाहेबांना भेटण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मातोश्रीवर हजेरी लावत असत. राजनाथ सिंह व अडवाणी हे बाळासाहेबांना वंदन करीत असल्याची जुनी छायाचित्रे या पोस्टरवर असून, शहाणे व्हा असा सल्ला आजच्या नेत्यांना यातून देण्यात आला आहे. या पोस्टरमुळे भाजपात खळबळ माजली असून, अमित शहा यांच्यापर्यंत हे पोस्टर व त्याचा भावार्थ पोहचविण्यासाठीच सेनेने ही पोस्टरबाजी केली आहे. अमित शहा यांच्या मुंबई भेटीत आज दिवसभर या पोस्टरचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
पुढे आणखी पाहा, शिवसेनेकडून कशी सुरु आहे ई-पोस्टरबाजी...