आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E toll Scheme Will Be Launched Soon, Says Nitin Gadkari

महाराष्ट्रासह देशभरात सुरु होणार E-Toll, टोल प्लाझावर लागणार नाहीत रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टोल भरण्यासाठी टोल प्लाझावर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशभरात ई-टोल सेवा सुरु केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या अंतर्गत वाहनांवर एक स्टिकर लावले जाईल. बॅंकेत पैसे भरुन हे स्टिकर विकत घेता येईल. प्रत्येक प्रवासासाठी वारंवार स्टिकर घेण्याची गरज नसेल. त्यातील पैसे संपले, की ते रिचार्जही करता येणार आहे.
नितीन गडकरी यांनी मेक इन सप्ताहाला भेट दिल्यानंतर बोलताना नितीन गडकरी म्हणाले, की टोल भरताना टोल प्लाझावर लांबच लांब रांगा लागल्या असतात. त्यात वेळेची, पेट्रोल-डीझेल आणि पैशांची नासाडी होते. त्यामुळे देशभरात ई-टोल नावाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत वाहन चालकांना बॅंकेतून ई-स्टिकर विकत घ्यावे लागेल. विशेष म्हणजे त्यातील रक्क्म संपल्यावर ते रिचार्जही करता येईल. त्यामुळे टोल प्लाझांवर थांबून रक्कम भरण्यासाठी वाहनचालकांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. याबाबत बॅंकांसोबत बोलणी झाली आहे. लवकरच हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, नितीन गडकरी म्हणाले... प्रदूषण नियंत्रणासाठी शहरांच्या वेशीवर वाहनतळ... सध्या रिंग रोडवर आहे भर...