आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीजेटीअायच्या प्राध्यापकाने विकसित केले भूकंपराेधक घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भूकंपप्रवण क्षेत्रात तग धरू शकतील असे नावीन्यपूर्ण घर निर्मितीचे तंत्रज्ञान व्हीजेटीअायचे प्राध्यापक डाॅ. अभय बांबाेले यांनी विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फक्त एक लाख रुपयांत ३०० ते ४०० फुटांच्या मजबूत अाणि भूकंपराेेधक घराची निर्मिती करणे शक्य हाेणार अाहे. कमी खर्चातील घर बांधणीचे हे तंत्रज्ञान अल्प उत्पादन गटासाठी फायदेशीर ठरणारे अाहे. या घरामध्ये स्वयंपाकघर अाणि शाैचालयाचा समावेश असल्याने स्वच्छ भारत मिशन माेहिमेसाठी देखील हे तंत्रज्ञान चांगला पर्याय ठरणार अाहे.  


मुंबई विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य अाणि वीरमाता जिजाबाई इन्स्टिट्यूटच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक असलेले डाॅ. बांबाेले यांनी हे अनाेखे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. सध्या ते अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी या विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन करत अाहेत. या घरांची भूकंपप्रवण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनेही त्यांचे संशाेधन सुरू अाहे.  


या तंत्रज्ञानात डाॅ. बांबाेले यांनी बांधकामाचा पाया, भिंत अाणि स्लॅब तयार करण्यासाठी तारांचे जाळे, वाळलेला पेंढा- गवत, स्थानिक मातीसारख्या सहज उपलब्ध हाेणाऱ्या साहित्याचा वापर केला अाहे. भिंती अाणि स्लॅब पॅनल बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तारांचे जाळे हे माती तसेच पेंढा- गवत यांच्या मिश्रणाने घट्ट केलेले अाहे. त्यानंतर या पॅनलला नेहमीप्रमाणे वाळू- सिमेंटच्या मिश्रणाचा लेप दिला जाताे.  


या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात अालेल्या भिंती अाणि स्लॅब यांची अावश्यक ते वजन पेलण्याच्या क्षमतेची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली अाहे. व्हीजेटीअायच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागात भूकंप सिम्युलेशन यंत्राची उभारणी करण्यात अाली अाहे. ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेली ही यंत्रणा महाविद्यालयाने जागतिक बँकेकडून मिळालेल्या निधीतून विकत घेतली अाहे. या यंत्रणेच्या माध्यमातून घरांच्या प्रतिकृतीची भूकंपराेधक क्षमतेची चाचणी घेण्यात येणार अाहे.  


अनेक वर्षे टिकणारी घरे : डॉ. बांबाेले
या तंत्रज्ञानाचा वापर करून घर बांधणीसाठी लागणारा खर्च माेठ्या प्रमाणावर कमी हाेण्यास मदत होईल.  ही घरे सुबक असतील अाणि मुख्यत: ती अनेक वर्षे टिकणारी असतील. त्यामुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान अावास याेजनेसाठी हे तंत्रज्ञान खूपच उपयाेगी ठरेल. ग्रामीण भागात गरिबांसाठी २०१९ पर्यंत ग्रामीण भागातील गरिबांसाठी १.३५ काेटी बांधता येतील, असा विश्वास डॉ. बांबोले यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...