आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फ्री वे’ला बाळासाहेबांचे नाव द्या, मनसे आमदार बाळा नांदगावकर यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पूर्व मुक्त मार्गास (ईस्टर्न फ्री वे) दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठीच नांदगावकर यांनी बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केल्याचे शिवसेनेत बोलले जात आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात बाळा नांदगावकर यांनी लिहिले की, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे राज्यातील जडण घडणातील योगदान, राज्यातील रस्ते वाहतूक सुधारणा व समाजोपयोगी कामासाठी अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे स्वप्न त्यांनी ते सत्यात उतरवले होते. ते द्रष्टे नेते होते त्यामुळे त्यांचे उचित व यथार्थ स्मारक व्हावे ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गाला स्व. बाळासाहेब
ठाकरे यांचे नाव द्यावे.

रिपाइंची बाबासाहेबांच्या नावाची मागणी
फ्री वेला मनसेने बाळासाहेबांच्या नावाची मागणी करताच रिपाइंने काही तासातच या मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची मागणी केली. ‘रिपाइं’ची मागणी पुढे आल्याने त्यांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सीएसटी ते चेंबर या मार्गावर 17 कि. मी. चा उन्नत असणारा ईस्टर्न फ्री वे वाहतुकीसाठी याच महिन्यात खुला झाला. उद्घाटनापासून हा मार्ग वादाचा विषय बनला आहे. या मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. एकूणच आठवले यांना महायुतीतून बाहेर पडायचे असल्याने ते संधी साधत असल्याची चर्चा आहे.