आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eastern Free Way Name Issue At Mumbai MNS Letter To CM

‘इस्टर्न फ्री वे’वरून नवा वाद; बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मनसेची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ला नाव देण्यावरून राजकीय वातवरण तापायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत विना सिग्नल, विना अडथळा जाण्यासाठी हा मार्ग खुला करण्‍यात आला होता.

'इस्टर्न फ्री वे'ला हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्‍यात आली आहे. मनसेचे गटनेते गटनेते बाळासाहेब नांदगावकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रही लिहिले आहे. यपूर्वी या महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आरपीआय) केली होती.

''बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडण घडणीतील मोलाचे योगदान लाभले आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाचे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणारे, बाळासाहेब हेच द्रष्टे नेते होते. त्यांचे यथार्थ स्मारक व्हावे, ही राज्यातील सर्व जनतेची मनापासून इच्छा आहे. राज्य सरकारने ‘इस्टर्न फ्री वे’ला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे.'', असे मनसेतर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, ‘इस्टर्न फ्री वे’च्या पहिल्या टप्प्याचे नुकतेच मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. ठाणे आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत विना सिग्नल, विना अडथळा जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग होत आहे.