मुंबई - आफ्रिकन देशांतून येणा-या संशयित इबोला रुग्णांच्या तपासणीसाठी नागपूर व पुणे विमानतळांवर तातडीने थर्मल स्कॅनर बसवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत केंद्रातर्फे रुई रोडरिगस यांनी न्यायालयात सांगितले, सध्या अशी स्कॅनर कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आताच दोन्ही विमानतळांवर ते बसवणे शक्य नाही.
लोकांच्या जिवाशी खेळणे अजिबात उचित नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे स्कॅनर पुणे व नागपूर विमानतळावर तातडीने बसवा, असे िनर्देश न्यायालयाने या वेळी केंद्राला दिले.