आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Economist Narendra Jadhav, Swamy, Sidhu, Mary Kom May Get BJP Rajya Sabha Berths

नरेंद्र जाधवांची राज्यसभेवर वर्णी, संघ व मोदींबाबत \'सॉफ्ट कॉर्नर\'चा फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहन भागवत आणि नरेंद्र जाधव एका कार्यक्रमात (फाईल फोटो) - Divya Marathi
मोहन भागवत आणि नरेंद्र जाधव एका कार्यक्रमात (फाईल फोटो)
नवी दिल्ली/मुंबई- राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतींकडून 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ऑलिम्पिक विजेती बॉक्सर मेरी कोम, महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, मल्याळम अभिनेता सुरेश गोपी, पत्रकार स्वपन दासगुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही कारणांमुळे मध्येच संस्थगित करण्यात आलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून (25 एप्रिल) सुरू होत आहे. 13 मे पर्यंत हे अधिवेशन चालणार असून, या काळात जीएसटीसह अन्य महत्त्वाचे विधेयक पारित करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. सोळाव्या लोकसभेचे हे आठवे अधिवेशन राहणार असून, या काळात सरकारने भरगच्च कार्यक्रम तयार केला आहे. राज्यसभेत भाजपचे बहुमत नसल्याने जीएसटीसारखी महत्त्वाची विधेयके पारित करण्यास सरकारला अडथळा येत आहे. यावर उपाय म्हणून राज्यसभेत सध्या राष्ट्रपती निर्देशित रिक्त असलेल्या 7 जागांसाठी सरकारने वरील नेत्यांना नामांकित केले आहे.
सातव्या जागेसाठी अभिनेता अनुपम खेर किंवा मोदींचे मित्र व पत्रकार रजत शर्मा यांच्यापैकी एका नावाचा विचार सुरु आहे. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर चंदीगढमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्याने त्यांच्याऐवजी रजत शर्मा यांनाच संधी दिली जाईल असे बोलले जात आहे. याबाबतही लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
संघाच्या जवळिकेमुळे नरेंद्र जाधवांना संधी-
अर्थतज्ज्ञ व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु राहिलेले नरेंद्र जाधव यांना राज्यसभेवर घेतल्याने आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला त्याचा फायदा होणार आहे. नरेंद्र जाधव यांनी यापूर्वी नियोजन आयोगात मोलाची कामगिरी केली आहे. तसेच देशाची आर्थिक निती व धोरणे काय असावीत यासाठी योगदान दिले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाधवांकडे मोठी जबाबदारी दिली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार अशा वावड्या उठल्या होत्या. एवढेच नव्हे तर लातूर किंवा शिर्डी या राखीव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस तिकीटावर लढणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, पुढे काहीच झाले नाही.
दरम्यान, भाजप सत्तेत आल्यानंतर नरेंद्र जाधव यांनी पंतप्रधान मोदींबाबत सकारात्मक भाष्य केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरातील एका कार्यक्रमातही जाधवांनी हजेरी लावली होती. त्यावेळी याची मोठी चर्चा झाली. त्याचवेळी नरेंद्र जाधवांची संघाशी जवळिक वाढत असल्याचे बोलले गेले. काँग्रेसचे नेते व अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर राज्यसभेतून निवृत्त होताच त्याच जागेवर भाजपने महाराष्ट्रातूनच मराठी व दलित असलेल्या अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधवांना तेथे पाठविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
पुढे वाचा, सिद्धूच्या पत्नीने दणका देताच भाजप सरळ झाली...
मोदींची इच्छा नसतानाही सुब्रमण्यम स्वामींना का मिळली संधी...