आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ED Attaches Chhagan Bhujbal Land Worth Rs160 Crore

भुजबळांचा 160 कोटींचा भूखंड जप्त, ऐन दिवाळीत जप्तीची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालकीच्या देविशा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावे असलेला नवी मुंबईतील भूखंड सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केला आहे. त्याची किंमत १६० कोटी रुपये आहे.

१५ सप्टेंबरला ईडीने भुजबळांविरोधात ‘लाँडरिंग अॅक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दिवाळीत जप्तीची कारवाई पूर्ण केली. खारघरमधील या भूखंडावर ‘हेक्स वर्ल्ड’ हा पॉश गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात येणार हाेता. सदनिका नोंदणी अॅडव्हान्स म्हणून ग्राहकांकडून २०१० मध्ये १०% रक्कम घेतली, पण बांधकाम पूर्ण झालेले नाही. मोठा गाजावाजा झाल्यानंतर या प्रकरणी तळोजा ठाण्यात भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीरच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. तांत्रिक बाबींमुळे भूखंडाचे हस्तांतरित होऊ शकले नाही, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करता आला नाही, असे स्पष्टीकरण कंपनी आणि भुजबळांच्या वतीने देण्यात आले होते.

कुटुंबाविरुद्ध २ गुन्हे
एसीबीपाठोपाठ ईडीने जूनमध्ये भुजबळ व कुटुंबीयांविरुद्ध दोन आर्थिक गुन्हे सूचना अहवाल नोंदविले. पहिला गुन्हा महाराष्ट्र सदन घोटाळा व कालिना भूखंड वाटप , तर दुसरा नवी मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पाचा होता.