आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळांचा नाशकातील गिरणा कारखाना, 290 एकर जमीन जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या कंपनीच्या मालकीची नाशिकमधील २९० एकर जमीन आणि साखर कारखाना जप्त केला. त्याची किंमत ५५ कोटी रुपये आहे.
ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या भुजबळांच्या कंपनीच्या मालकीच्या गिरणा साखर कारखाना आणि त्याला लागून असलेल्या २९० एकर जमिनीवर जप्ती आणली. जप्ती आदेशात या मालमत्तांची किंमत ५५ कोटी नमूद केली आहे. ईडीने साखर कारखाना सुरू ठेवण्यावर बंदी घातली आहे. २७ कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्यमापन करून भुजबळांच्या कंपनीने गिरणा साखर कारखाना खरेदी केला होता. २०१० मध्ये ऋण वसुली न्यायाधिकरणाने केलेल्या लिलावात भुजबळांच्या कंपनीने तो खरेदी केला होता. त्याच्या खरेदीसाठी भुजबळ व कुटुंबीयांनी मनी लाँडरिंगमार्फत मिळालेल्या पैशाचा वापर केला होता, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
काळ्या पैशातून गिरणा कारखान्याची खरेदी?
गिरणा साखर कारखाना आणि २९० एकर जमीन भुजबळांच्या मेसर्स आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. ने लिलावातून घेतली होती. त्यात १० कोटी रुपयांच्या कर्जाव्यतिरिक्त १७,८२,५५,०१० रुपये अवैध पैशातून अदा करण्यात आले होते. मेसर्स आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. आणि मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांच्याकडून ही रक्कम मिळाली होती.
यापूर्वीही केली होती जप्ती..
याआधी ईडीने भुजबळ कुटुंबियांची सुमारे 280 कोटी रूपयांची संपत्ती, मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर संचालक असलेल्या 'देविशा कन्स्ट्रक्शन'ची नवी मुंबईतील 160 कोटींची जमीन ईडीने जप्त केली आहे. नवी मुंबईच्या खारघर भागातील या जमीनीचा हक्क भुजबळ कुटुंबीयांकडे आहे.
डिसेंबर महिन्यात भुजबळांची वांद्रे आणि सांताक्रुजमधली 110 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने 'फेमा' कायद्यांतर्गात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध एफआयआर नोंदवली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे.
बातम्या आणखी आहेत...