आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीच्या कायदे सल्लागाराची पगारवाढ थांबवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सहकारी महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) उप कायदे सल्लागाराची तीन वर्षांपर्यंत पगारवाढ करू नये, असे निर्देश ‘ईडी’कडून गुरुवारी देण्यात आले. ए. सी. सिंग असे सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चार वर्षांपूर्वी तक्रार दिली होती.

तक्रारदार महिला सुरुवातीला दिल्ली येथे कार्यरत होती. तेव्हापासून सिंगने तिला त्रास देणे सुरू केले. काही वर्षांनी महिलेची मुंबईला बदली झाली. सिंग तिला नेहमी कामानिमित्त दिल्लीत बोलावून घेत असे. त्या वेळी आपल्यावर अनेकदा सिंगने अत्याचार केल्याचे महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी ईडीची एक समिती चौकशी करत होती. चौकशीदरम्यान सिंग याच्याविरोधात आरोप सिद्ध झाले. त्यानंतर त्याची तीन वर्षांपर्यंत पगारवाढ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संबंधित महिलेला दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे समितीने म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...