आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे देशातील सगळ्यात मोठा टॅक्स चोर; तो होता भंगारवाला बनला 2 पत्नींच्या मदतीने खरबपती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हसन अली खान पत्नी रहीमा समवेत. - Divya Marathi
हसन अली खान पत्नी रहीमा समवेत.
मुंबई/पुणे- देशातील सगळ्यात मोठा टॅक्स चोर आणि हवाला व्यावसायिक हसन अली खान याची सीबीआयने नव्याने चौकशी सुरु केली आहे. ईडीने दावा केला आहे की त्याने 2001 ते 2008 दरम्यान 1.10 हजार कोटी रुपयांची काळी कमाई जमा केली. एका भंगारवाल्यापासू हसन अली हा हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक बनला. त्याला ही संपत्ती जमा करण्यास त्याच्या दोन पत्नींनी साहाय्य केले.
 
असा बनला भंगारवाल्यापासून कोट्याधीश
- हसन अलीचे जीवन हे एखाद्या चित्रपटात शोभावे असेच आहे. 1953 मध्ये हैदराबादमध्ये जन्म झालेल्या हसन अलीचे शिक्षणही याच शहरात झाले.
- त्याचे वडील एक्साइज डिपार्टमेंटचे कर्मचारी होते. त्यांची सांपत्तिक स्थिती 70 च्या दशकात फारशी चांगली नव्हती.
- त्यानंतर हसन अलीने भंगाराचा व्यवसाय सुरु केला. काहीच वर्षात त्याचा टर्नओव्हर 30 लाखावर पोहचला. त्यानंतर कार भाडयाने देण्याचा व्यवसाय सुरु केला. 1988 मध्ये तो दुबईला गेला. तेथे त्याने मेटल ट्रेडिंगचा व्यवसाय सुरु केला. तेथे त्याच्या मनात हॉर्स रेसिंगचा छंद सुरु झाला.

पत्नी बनल्या मदतनीस
- हसन अलीला भंगार व्यावसायिकापासून कोट्याधीश बनविण्यात त्याच्या पत्नींची महत्वपूर्ण भूमिका होती. त्याची पहिली पत्नी ही हैदराबाद येथील उन्नीसा बेगम आहे तर दुसरी पत्नी पुण्यातील रहीमा खान आहे.
- उन्नीसा ही हैदराबाद येथील निजामाची नातलग आहे. त्याचाच फायदा घेत ते अब्जाधीशांच्या संपर्कात आले होते. भंगार व्यवसायाबरोबरच त्यांनी पुरातन वस्तुंचा व्यवसायही सुरु केला.
- त्यानंतर त्यांची भेट शस्त्रास्त्र व्यापारी अदनान खशोगीबरोबर झाली त्याच्या मदतीने त्यांनी हवाला आणि शस्त्रास्त्र व्यापार सुरु केला.

दुसऱ्या पत्नीने बनवले घोडा व्यापारी
- हैदराबादमध्ये अनेक प्रकरणे घडल्यानंतर 1999 मध्ये हसन अली पुण्यात आला. याच शहराने त्याचे नशीब बदलले.
- पुण्यात त्याने घोड्याच्या ब्रीडिंग आणि रेसिंगचा धंदा सुरु केला. तेथेच त्याची भेट हॉर्स ट्रेनर फैसलची बहिण रेहीमा सोबत झाली. त्यानंतर त्याच्यात प्रेम झाले.
- त्यानंतर हसन अलीने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि रहीमा सोबत लग्न केले. आपल्यापेक्षा 22 वर्षे लहान रहीमापासून हसन अलीला एक मुलगा आहे.
- रहीमाला हसन अलीची सर्व माहिती आहे. हसन अली हा आपल्या मेहुण्याच्या मदतीने हैदराबादमध्ये घोडावाला या नावाने ओळखला जात होता.
- त्यानंतर त्याने पुर्ण देशात घोडे पाठवणे सुरु केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हसन अलीचे घोडे लंडनसह अन्य ठिकाणी स्पर्धेत सामील झाले होते.
- पुण्यात हसन अलीचे काही बंगले आणि फ्लॅटस आहेत. याशिवाय मुंबईत पोद्दार रोडवर एक कॉम्पलेक्स आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...