आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीचे मल्ल्यांना आणखी समन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनला पळालेले उद्योजक विजय मल्ल्यांना ईडीने पुन्हा एक समन्स बजावले आहे. २ एप्रिलपर्यंत त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आयडीबीआयकडून घेतलेल्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. मल्ल्या यांनी भारतात तपास पथकासमोर हजर राहण्यासाठी गुरुवारी आणखी वेळ मागितला होता. त्यानुसार ईडीने मल्ल्यांना वेळ देत हे समन्स बजावण्यात आले.

ईडीच्या तपास अधिकाऱ्याला मेल पाठवून मल्ल्यांनी आपण पुढील महिन्यात चौकशीसाठी हजर राहू शकू, असे म्हटले होते. मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयने गेल्या वर्षी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने मल्ल्यांविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला असून मल्ल्यांच्या मालकीची किंगफिशर एअरलाईन्स कंपनीही या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.