आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Education Fees Information Should Declare : Chief Information Commissioner Ratnakar Shetty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षण शुल्काबाबत माहिती जाहीर करा :मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क नेमके कशासाठी आकारले आहे, याची माहिती शिक्षण शुल्क समितीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत. आपल्या शुल्काचा विनियोग कसा केला जातो, हे जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांना पूर्णपणे अधिकार असून त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे, असेही गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांना शुल्काबाबत माहिती मिळावी, यासाठी माहिती अधिकारात कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती आयोगाकडे अपिल केले होते. त्यावरील सुनावणीत गायकवाडांनी हे आदेश दिले आहे. तसेच ही माहिती कशाप्रकारे असावी आणि त्यात कशाचा अंतर्भाव असावा, याचे नेमके धोरण ठरवण्यासाठी अपीलकर्ता विवेक वेलणकर यांनी 15 दिवसांचा कालावधी द्यावा. त्यानुसार त्यांनी सादर केलेल्या सूचनांचे पालन शिक्षण शुल्क समितीने करावे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना लुबाडण्याचे वाढते प्रकार
राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अशी दोन हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांकडे कित्येकदा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही जादा शुल्क आकारून विद्यार्थ्यांना लुबाडण्याचे प्रकार शिक्षण संस्था करीत असतात.


या महाविद्यालयांनी दिलेल्या प्रस्तावानुसार शिक्षण शुल्क समिती शुल्क ठरवते. मात्र, त्या प्रमाणात संबंधित महाविद्यालयात सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का, शुल्क कशाचे आकारले जाते आहे, हे तपासण्याची यंत्रणा नाही. तसेच त्यासंबंधी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाविरोधात दादही मागता येत नाही. त्यामुळेच माहिती अधिकारात कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी शिक्षण शुल्क समितीकडे 200८ मध्ये तक्रार करून संकेतस्थळावर महाविद्यालयांच्या शुल्काची सविस्तर माहिती टाकण्याची विनंती केली. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांनी माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता. याबाबत आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर झाला आहे.


आयुक्तांकडून सुनावणी
संकेतस्थळावर जागा उपलब्ध नसल्यामुळे माहिती टाकता येत नसल्याचे उत्तर शिक्षण शुल्क समितीने दिले. परंतु वेलणकर यांच्या प्रयत्नामुळे काही प्रमाणात माहिती टाकण्याचे काम सुरू झाले. हा प्रश्न महत्त्वाचा असल्याने मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी सुनावणी घेतली. या वेळी शिक्षण शुल्क समितीचे कार्यालयीन सचिव पद्माकर गायकवाड उपस्थित होते.


संकेतस्थळावर माहिती द्या
वेलणकर यांनी सांगितले की, अनेक महाविद्यालयात सुविधा नसतानाही शुल्क आकारले जातात. शिक्षण शुल्क समिती प्रत्येक महाविद्यालयाची तपासणी करू शकत नाही. त्यामुळे शुल्क कशाचे घेतले याबाबत संकेतस्थळावर नोंद करावी, तर खरीच माहिती समोर येईल. शिक्षकांच्या पगारीपासून सर्व माहिती असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.